// // Leave a Comment

Marathi Stenographer Chapter 1

            मराठी लघुलेखन(Marathi Shorthand)

                       पाठ १ - व्यंजने

1) सरळ रेखाकृती व्यंजने

2) कोराकृती व्यंजने

3) इतर व्यंजने

4) जोड व्यंजने

Stenographer
Marathi stenographer part-1
वरील संकेतरेखांचे मनन केल्यानंतर प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात येईल की, ‘व’, ‘ह’ आणि ‘य’ या व्यंजनांखेरीज बाकीच्या व्यंजनांकरिता खालील आकृतीत दाखविल्याप्रमाणे भूमितीतील सरळ रेखांची किंवा कोराकृती रेखांची योजना करण्यात आली आहे :-

आकृती क्रमांक १:-


१. ‘क’ आणि ‘ख’ या व्यंजनांकरिता एका आडव्या पुसट सरळ संकेतरेखेचा उपयोग केला असुन हीच रेखा जाड केली म्हणजे ‘ग’ किंवा ‘घ’ ची संकेतरेखा तयार होते.
२. ‘र’ करिता ज्या संखेतरेखेची योजना केली आहे ती रेखा तिरपी असुन ‘क’, ‘ख’ च्या संकेतरेखेशी तिचा 30° चा कोन होतो.
३. ‘च’, ‘छ’ कविताही ‘र’ प्रमाणे  तिरप्या संकेतरेखेची योजना केली असून ‘क’, ‘ख’ साठी योजिलेल्या संकेतरेखेशी तिचा 60° चा कोन होतो.हीच रेखा जाड केली म्हणजे ' ज ' अथवा ' झ ' ची संकेतरेखा तयार होते . 
४. ‘ त ' , ' थ ' करिता सरळ लंब संकेतरेखेची योजना केली असून
 ' क ' ख ' च्या संकेतरेखेशी तिचा ९० अंशांचा कोन होतो . हीच रेखा जाड करून तिची ' द ' आणि ' ध ' या व्यंजनांकरिता योजना केली आहे .
५ . ' प ' आणि ' फ ' करिता पुनः एका तिरप्या संकेतरेखेची योजना केली असून ‘ क ’ , ‘ ख ’ च्या संकेतरेखेशी तिचा १२० अंशाचा कोन होतो . ही रेखा जाड करून तिची ' ब ' आणि ' भ ' या व्यंजनांसाठी योजना केली आहे.

आकृती क्रमांक २:-



  1. ' ल ' ' ळ ' आणि ' र ' : - आकृती २ मध्ये दर्शविल्याप्रमाणे वर्तुळाचे उभे आणि आडवे असे दोन समान भाग केले म्हणजे वरच्या बाजूला डावीकडे जी कोराकृती रेखा तयार होते तिची योजना ‘ ल ' आणि ' ळ ' करिता केली आहे आणि उजवीकडे जी उथळ कोराकृती रेखा तयार होते तिची योजना र ' करिता केली आहे . म्हणजे ' र ' करिता / आणि … अशा दोन संकेतरेखांची योजना केली आहे .
    २ . ' श ' , ' ष ' आणि ' क्ष ' व ' ज्ञ ' : - आकृती २ मध्ये वरीलप्रमाणे खालच्या बाजूला डावीकडे जी कोराकृती रेखा तयार होते तिची योजना ' श ' आणि ' या व्यंजनांकरिता केली आहे . हीच रेखा जाड केली म्हणजे ' क्ष ' ची संकेतरेखा तयार होते . त्यानंतर उंजवीकडे जी कोराकृती रेखा शिल्लक उरते तिची योजना ' ज्ञ ' करिता केली आहे .

आकृती क्रमांक ३:-


१ . आकृती ३ मध्ये दर्शविल्याप्रमाणे वर्तुळाचे तिरपे दोन समान भाग केले म्हणजे डाव्या बाजूस जी कोराकृती रेखा तयार होते तिची योजना ' ट ' आणि ' ठ ' या व्यंजनांकरिता केली आहे . ' ट ' व ' ठ ' ची संकेतरेखा जाड केली म्हणजे ' ड ' व ' ढ ' ची संकेतरेखा तयार होते .
२ . वर्तुळाच्या उजव्या बाजूला वरीलप्रमाणे जी कोराकृती रेखा तयार होते तिची योजना ' स ' या व्यंजनाकरिता केली आहे .
३ . अधोभागीच्या कोराकृती रेखेची योजना ' न ' या व्यंजनाकरिता केली आहे. ' न ' ची संकेतरेखा जाड केली म्हणजे ' ण ' आणि ' ङ ' ची संकेतरेखा तयार होते .

व, य आणि ह:-



                                  खुलासा

१ . वरील संकेतरेखांची ओळख झाल्यानंतर एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येईल की , काही ठिकाणी एकाच संकेतरेखेची दोन व्यंजनांकरिता योजना केली आहे . उदाहरणार्थ , ‘___’ या संकेतरेखेची योजना ' क ' आणि ' ख ' या व्यंजनाकरिता केली आहे . तसेच ‘ | ’ या संकेतरेखेची योजना ' त ' आणि ' थ ' या व्यंजनांकरिता केली आहे . म्हणजे काही काही व्यंजनांच्या जोड्या ठरवून देण्यात आल्या आहेत आणि अशा प्रत्येक जोडीकरिता एकाच संकेतरेखेची योजना केली आहे . त्या प्रत्येक जोडीपैकी दुसरे व्यंजन मराठी भाषेत पहिल्या व्यंजनाच्या मानाने फारच कमी वेळा येते . लघुलिपीमध्ये लिहिलेले वाचताना अशी एखादी द्विव्यंजनात्मक संकेतरेखा नेमकी कोणत्या व्यंजनाकरिता काढली आहे हे मागच्या पुढच्या संदर्भावरून सहज समजून येते . परंतु जेथे समजण्यास अडचण पडेल असे वाटत असेल तेथे जोडीतील दुसरे अक्षर सुरवातीस एका लहानशा रेखिकेने काटावे .
eg.

२ . संकेतरेखांची लांबी – प्रत्येक संकेतरेखेची लांबी साधारणतः एक षष्ठमांश इंच असावी . तसेच , ती सर्वत्र समान असली पाहिजे .

३ . संकेतरेखा काढण्याच्या दिशा - क , ख , ग , घ , ङ , ण , न आणि म करिता योजलेल्या आडव्या संकेतरेखा डावीकडून उजवीकडे काढाव्या .

eg.
या संकेतरेखांना आपण ‘ अग्रगामी संकेतरेखा ' असे नाव देऊ .
च , छ , ज , झ , ट , ठ , ड , ढ , त , थ , द , ध , प , फ , ब , भ , श , ष , स , क्ष आणि ज्ञ करिता योजलेल्या उभ्या संकेतरेखा वरून खाली काढाव्या .
eg.

या संकेतरेखांना आपण ' अधोगामी संकेतरेखा ' असे नाव देऊ .


 ' य ' , ' ल ' , ' ळ ' आणि ' व ' करिता योजिलेल्या संकेतरेखा खालून वर काढाव्या.
eg.

या संकेतरेखांना आपण ' ऊर्ध्वगामी संकेतरेखा ' असे नाव देऊ .


' र ' आणि ' ह ' करिता ऊर्ध्वगामी व अधोगामी अशा दोन्ही प्रकारच्या संकेतरेखांची योजना केली आहे .
eg.


टीप - १ . नवीनच लघुलिपी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कदाचित असे वाटेल की , ' च ' , ' छ ' आणि ' र ' या व्यंजनांकरिता एकच संकेतरेखा दिली आहे परंतु वस्तुस्थिती तशी नाही . या दोन संकेतरेखा वरवर पाहता सारख्या दिसत असल्या तरी त्यांमध्ये फरक आहे . पहिला फरक असा की ' च ' , ‘छ’ ची संकेतरेखा वरून खाली लिहिली जाते , तर ' र ' ची संकेतरेखां खालून वर लिहिली जाते . दुसरा फरक असा की वहीवरील आडव्या रेघेशी संकेतरेखांचे होणारे कोन वर सांगितल्याप्रमाणे भिन्न भिन्न अंशांचे होतात .
२ . ' ल ' - ' ळ ' करिता योजलेली संकेतरेखा केव्हा केव्हा वरून खाली म्हणजे अधोगामीही लिहिली जाते . तसेच , ' ज्ञ ' करिता योजिलेली संकेत रेखा केव्हा केव्हा ऊर्ध्वगामीही लिहिली जाते . यासंबंधीचा अधिक खुलासा पुढे ओघाने येईलच .


                                       अभ्यास

विद्यार्थ्यांनी खाली दिल्याप्रमाणे संकेतरेखा काढाव्या. ऊर्ध्वगामी आणि अधोगामी संकेतरेखा रेषेवर टेकतील अशा बेताने काढाव्या आणि अग्रगामी संकेतरेखा रेषेवर काढाव्या. संकेतरेखांची दिशा बाणांनी दर्शविली आहे. या संकेतरेखा कित्येक वेळा गिरवाव्या. जो पर्यंत तुम्हाला तोंडी पाठ होत नाही.
eg.



हे ब्गाॅग मराठी लघुलेखनासाठीच आहे….
आवडले तर नक्कीच शेअर करा




0 comments: